शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीकरांची एकतेची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:07 IST

सांगली : समाजात असलेले समानतेचे, एकतेचे वातावरण दूषित करणाºयांना सणसणीत चपराक देत एकीची ताकद सांगलीकरांनी रविवारी दाखवून दिली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत शालेय विद्यार्थी, तरूण, तरूणी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांनी एक होत समानतेचा संदेश दिला. रविवार सुटीचा दिवस आणि मकरसंक्रांतीचा सण असतानाही, रविवारी सकाळी हजारो सांगलीकर एकतेचा ...

सांगली : समाजात असलेले समानतेचे, एकतेचे वातावरण दूषित करणाºयांना सणसणीत चपराक देत एकीची ताकद सांगलीकरांनी रविवारी दाखवून दिली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत शालेय विद्यार्थी, तरूण, तरूणी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांनी एक होत समानतेचा संदेश दिला. रविवार सुटीचा दिवस आणि मकरसंक्रांतीचा सण असतानाही, रविवारी सकाळी हजारो सांगलीकर एकतेचा संदेश देत रस्त्यावर उतरले होते. स्फूर्तिदायी घोषणा आणि देशभक्तीपर गीतांनी रॅलीचे वातावरण भारावून गेले होते. रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झाला.गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने सद्भावना एकता रॅलीची तयारी केली होती. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार सकाळपासूनच सांगली शहरासह जिल्ह्यातील विविध घटकांतील नागरिक कर्मवीर भाऊराव पाटील चौकात एकत्र आले होते. साडेनऊच्या सुमारास आशा पाटील, शारदा भोसले, रामदास कोळी, शफीक खलिफा, अभिनंदन पाटील आदी दिव्यांगांच्याहस्ते हवेत फुगे सोडून रॅलीची सुरूवात करण्यात आली. रॅलीच्या सर्वात पुढे स्केटिंग खेळाडू होते. त्यानंतर जिल्हाधिकारी विजय काळम पाटील स्वत: हातात तिरंगा ध्वज घेऊन अग्रभागी होते. पुष्पराज चौक, पंचमुखी मारूती रोड, तरूण भारत क्रीडांगण, महापालिका चौक, राजवाडा चौक, स्टेशन रोडवरून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर जाऊन रॅलीची सांगता झाली.रॅली मार्गक्रमण करत असताना घोषणा व देशभक्तीपर गीतांनी वातावरणात उत्साह निर्माण झाला होता. पंचमुखी मारूती रस्त्यावर ठिकठिकाणी रॅलीत सहभागी नागरिकांनी खडीसाखरेचे वाटप करण्यात येत होते. रॅलीत शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, राजकीय नेतेमंडळींचा सहभाग होता. विशेष म्हणजे सर्व पक्षांतील नेत्यांचा रॅलीत सहभाग असतानाही, ते कुठेही अग्रभागी नव्हते. त्यांनी रॅलीच्या शेवटीच थांबणे पसंत केले.शिवाजी क्रीडांगणावर झालेल्या समारोप कार्यक्रमातही स्टेजवर केवळ पोलिस व प्रशासकीय अधिकारी होते. सहभागी नेतेमंडळींची स्टेजच्या समोर बसण्याची सोय करण्यात आली होती. स्टेजवरून पुन्हा एकदा तिरंगी रंगाचे फुगे हवेत सोडण्यात आले. रॅलीची शिवाजी क्रीडांगणावर सांगता होण्यापूर्वी तिथे केवळ विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील व पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर एकतेची शपथ देऊन व राष्टÑगीताने सांगता झाली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत रॅली पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकाºयांनी जनतेचे आभार मानले.प्रशासनाचे : नेटके नियोजनजिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे नेटके नियोजन करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह अधिकाºयांनी यशस्वितेसाठी प्रयत्न केले.